गोव्यात गेलेले ते ८ जण कोरोना पॉझिटिव्ह

गोव्यात गेलेले ते ८ जण कोरो-The 8 people who went to Goa

गोव्यात गेलेले ते ८ जण कोरोना पॉझिटिव्ह

लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमध्ये अडकलेल्या लोकांच्या सोयीसाठी सरकारने रेल्वे सेवा सुरू केली. पण आता याच रेल्वेतून मुंबईहून गोव्याला गेलेल्या 8 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. आता या रेल्वेनं प्रवास केलेल्या चाचणी करण्यात येणार आहे. यापैकी 100 प्रवाशांची चाचणी करण्यात आली आहे. तर आणखी 450 प्रवाशांची चाचणी केली जाणार आहे.

तर एक पॉझिटिव्ह रुग्ण कर्नाटकमधून रस्त्याने गोव्याला आलेला आहे. या 9 नवीन रुग्णांमुळे गोव्यामधील एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 29 झाली आहे. त्यातील 7 जण कोरोनामुक्त झाले असून 22 एक्टिव्ह केसेस आहेत. 1 मे रोजी गोव्यातील 7 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर संपूर्ण गोवा राज्य कोरोनामुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली होती. पण गेल्या काही दिवसात इथं कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

या सर्व रुग्णांवर मडगाव इथल्या कोवीड हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. पण रेल्वेनं जाणाऱ्या प्रवाशांची आधी चाचणी होते मगच त्यांना रेल्वेत प्रवेश दिला जातो, अशी प्रक्रिया असताना कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रेल्वेमधून गेले कसे?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. किंवा कोरोनाची लक्षणं दिसत नसल्याने त्यांना जाण्याची परवानगी दिली गेली असल्यास प्रवाशांच्या चाचणीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याची गरज आता व्यक्त होऊ लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here