मार्च ते ऑगस्ट महिन्यांसाठी कर्जदारांना आरबीआयने दिला दिलासा.

मार्च ते ऑगस्ट महिन्यांसा-March to August

मार्च ते ऑगस्ट महिन्यांसाठी कर्जदारांना आरबीआयने दिला दिलासा.

मार्च ते ऑगस्ट या 6 महिन्यांसाठी कर्जदारांना आरबीआयने मोठा दिलासा दिलेला आहे. कर्ज न भरण्याची मुदत आरबीआयने आणखी तीन महिने वाढवली आहे. आरबीआयच्या या घोषणेचा फायदा कोट्यवधी लोकांना होणार आहे. कर्जाची सवलत आणखी तीन महिन्यांना वाढवली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत होता आणि सगळ्यांना हीच अपेक्षा लागून राहिलेली होती.

याचसंदर्भातली चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चालू होती. तीच महत्त्वाची घोषणा आज आरबीआयने केली आहे. त्यामुळे ऑगस्टपर्यंत आता कर्ज भरलं नाही तरी चालणार असून, सर्वसामान्यांच्या हातात पैसा रहावा यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसंच येणाऱ्या मान्सूनकडून खूप मोठ्या अपेक्षा असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी सांगितलं. आज पत्रकार परिषद घेऊन दास यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here