राज्यात कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण वाढलेले आहे वाचा….!

आज सुमारे ८,३८१ रुग्ण कोरोनामुक्त-Today, about 8,381 patients are coronary free

राज्यात कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण वाढलेले आहे वाचा….!

राज्यात आज कोरोनाच्या २१९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात ३७ हजार १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ९६४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत १७ हजार ९१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५६ हजार ९४८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात १०५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १८९७ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३२, ठाण्यात १६, जळगावमध्ये १०, पुण्यात ९ ,नवी मुंबई मध्ये ७, रायगडमध्ये ७, अकोल्यात ६, औरंगाबाद मध्ये ४, नाशिक ३, सोलापूरात ३, सातारामध्ये २, अहमदनगर १, नागपूर १, नंदूरबार १, पनवेल १ तर वसई विरारमध्ये १ मृत्यू झाला आहे. या शिवाय गुजरात राज्यातील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.
आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २१ एप्रिल ते २४ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६६ मृत्यूंपैकी मुंबईचे २१, ठाण्याचे १५, जळगावचे १०, नवी मुंबईचे ७, रायगडचे ७, अकोल्याचे २, साता-याचे २, अहमदनगर १, नंदूरबार १ असे मृत्यू झाले आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७२ पुरुष तर ३३ महिला आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here