तुकाराम मुंडे यांच्या मागे शिवसेना खंबीरपणे उभी…!

तुकाराम मुंडे यांच्या मा-Tukaram Munde's Hon

तुकाराम मुंडे यांच्या मागे शिवसेना खंबीरपणे उभी…!

कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला नागपूर शहरात आटोक्यात आणण्यासाठी नागपूरमध्ये राबवलेला ‘तुकाराम मुंडे पॅटर्न’ चांगलाच प्रभावी ठरलेला दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांनी नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेना जिल्हाध्यक्षांनी मुंडेच्या कामाचे कौतुक केले आहे. तर दुसरीकडे भाजपा पक्षाकडून मात्र आयुक्त तुकाराम मुंडे मनमानी कारभार करतात असा आरोप केला गेला आहे. त्यामुळे कोरोना काळात नागपूरमध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नुकतंच शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव आणि तुकाराम मुंडे यांनी जवळपास ४० मिनिटांच्या बैठकीत विविध उपाययोजनांबाबत चर्चा केली. या चर्चेनंतर प्रकाश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना मनपा आयुक्त तुकाराम मुंडेंच्या पाठीशी शिवसेना उभी आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच नागपुरात कोरोना नियंत्रणासाठी मुंडेंनी अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्या सर्व उपाययोजनांचेही शिवसेना जिल्हाप्रमुखांनी कौतुक केले. तसेच शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here