Skip to content Skip to footer

सूचनांचे पालन करा, खबरदारी घ्या! – आदित्य ठाकरे.

सूचनांचे पालन करा, खबरदारी घ्या! – आदित्य ठाकरे.

यंदा प्रथमच इतक्या जवळून चक्रीवादळ जाणार आहे. मुंबईपासून अवघ्या ११० किमी अंतरावर पालघरजवळ निसर्ग चक्रीवादळ किनारपट्टीला धडक देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी ११५ ते १२५ किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा स्कायमेट या खासगी वेधशाळेने दिला आहे. दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जनतेला सूचनांचे पालन करण्याचे तसेच खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित यंत्रणांना सूचनाही दिल्या आहेत. ते संपूर्ण परिस्थितीवर सतत नजर ठेवून आहेत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच सर्व नागरिकांनी खबदारी घ्यावी आणि प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं,” असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उद्या काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे. केंद्रीय जल आयोगाने सिंधुदूर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, मुंबई आणि नाशिकमधील काही भागांमध्ये फ्लॅश प्लड येण्यासंदर्भातील इशारा दिल्याचेही स्कायमेटनं म्हटलं आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये तसेच गुजरामध्येही उंच लाटा उसळतील, असा इशाराही स्कायमेटनं दिला आहे.

Leave a comment

0.0/5