राज्यात स्थानिकांना रोजगार द्या ! – मुख्यमंत्री.

राज्यात स्थानिकांना रोजगार द्या-Provide employment to locals in the state

राज्यात स्थानिकांना रोजगार द्या ! – मुख्यमंत्री.

राज्यात सुरू असलेल्या मेट्रोसारख्या पायाभूत सुविधांच्या विकास कामासांठी स्थानिकांना रोजगार द्या, कामे बंद पडू देऊ नका, भूमिपुत्रांना रोजगार देतानाच कामांसाठी लागणारे प्रशिक्षण देखील त्यांना द्या, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आज दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आदी विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी मंत्रालयात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व संजय बनसोडे, अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोनामुळे राज्यभरात लॉकडाऊन झाले, आता मुंबई महानगर परिसर, पुणे वगळता राज्यात अन्य ठिकाणी उद्योग सुरू झाले आहेत. मात्र मजुरांची आणि कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. परराज्यातील मजूर त्यांच्या गावी गेले आहेत. ते जेव्हा परत येतील तोपर्यंत त्यांच्यावर विसंबून न राहता विकास कामांसाठी लागणारे कुशल, अकुशल कर्मचारी, मजूर यांची विभागवार यादी करा. त्याचबरोबर कोणत्या विभागात रोजगार उपलब्ध आहे याचाही तपशील घ्या आणि राज्यभर कुशल मनुष्यबळ उपलब्धतेसाठी जाहिराती द्या.

खास करून जेथे जेथे मेट्रोची कामं सुरू आहेत तेथे मोठ्या प्रमाणावर जाहिराती द्या. त्यामुळे राज्यातील भूमिपुत्रांना रोजगार मिळेल. सुरूवातीच्या काळात या भूमिपुत्रांना काही काळ प्रशिक्षण देण्याची व्यवस्था देखील करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here