झाडांच्या वयानुसार व उत्पादन क्षमतेनुसार वाढीव मदत द्यावी ! – आमदार योगेश कदमांची मागणी.

विद्युत-पूरवठा-करणाऱ्या/Power-supply

झाडांच्या वयानुसार व उत्पादन क्षमतेनुसार वाढीव मदत द्यावी ! – आमदार योगेश कदमांची मागणी.

निसर्ग चक्री वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शेती व आंबा, सुपारी, नारळ, काजू या फळबागांचे प्रामुख्याने नुकसान झाले आहे. या परिस्थितीची कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आमदार व माजी मंत्री रामदास कदम, आमदार योगेश कदम सोबत पाहणी दौरा केला.

याठिकाणी नुकसानग्रस्तांना सर्व नियम व अटींनुसार प्रति हेक्टर १८,००० रुपये आर्थिक मदत करण्यात येणार होती. परंतु ही मदत पुरेशी नसल्याचे सांगत, यामध्ये अधिक वाढ करण्याची मागणी आमदार योगेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिला असून, मुख्यमंत्र्यांनी या मागणीला मान्यता दिली आहे. त्यानुसार ही मदत ही प्रति हेक्टरी ५०,००० रुपये अशी मदत देण्यात येत आहे. “परंतु यावर मी असमाधान व्यक्त करून नुकसानग्रस्तांना ही मदत अधिक प्रमाणात कशी मिळेल, यासाठी प्रयत्नशील आहे”, असे आमदार योगेश कदम यांनी म्हटले आहे.

तसेच सरसकट हेक्टरी मदती व्यतिरिक्त पडझड झालेल्या जुन्या झाडांची त्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार व वयानुसार नुकसान भरपाईची रक्कम मिळावी यासाठी कृषी मंत्री महोदयांना मागणी केल्याचे देखील आमदार योगेश कदम यांनी सांगितले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here