“महानगर निगम, बँक, पोस्टल सेवा कर्मचाऱ्यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा” – खासदार अरविंद सावंत.

“महानगर निगम, बँक, पोस्टल सेवा कर्मचाऱ्यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा” – खासदार अरविंद सावंत.

सध्या कोरोनाच्या वाढत्या संकटात मागील दोन अडीच महिन्यांपासून देशात लोकडाऊन लागू आहे. या लोकडाऊन मध्ये अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना या लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली होती. आता अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवास अधिक जलदगतीने होण्यासाठी तिन्ही मार्गावर रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच रेल्वेने प्रवास करताना अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असणार आहे, असे नियम असलेले परिपत्रक मनपा आयुक्तांनी काढले होते.

"महानगर निगम, बँक, पोस्टल से-"From Mahanagar Nigam, Bank, Postal

राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईच्या लोकल रेल्वेने प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना इ-पास देणेबाबत मुंबई महानगरपालिकेने एक परिपत्रक निर्गमित केलेले आहे. परंतु त्यामध्ये विविध आवश्यक सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांच्या आस्थापनांची नावे नमूद करण्यात आलेला नाही.

शिवसेना खासदार, माजी केंद्रीय मंत्री श्री. अरविंद सावंत यांनी यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांना पत्र लिहुन महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, एसटी महामंडळ, सहकारी व सरकारी बॅंका, पतपेढ्या तसेच पोस्टल सेवा आस्थापनांमधील कर्मचार्‍यांचा अंतर्भाव निर्गमित परिपत्रकामध्ये करुन, या ही कर्मचार्‍यांना सदर सेवेचा लाभ द्यावा, अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केलेली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here