कोरोनाशी महाराष्ट्र लढतोय…!
सध्या राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख १६ हजारच्या पुढे गेली आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. त्यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे चिंतेचं वातावरण असलं तरी आघाडी सरकार या सगळ्या परिस्थितीशी ताकदीने लढत आहे. राज्यात आरोग्य सुविधा वाढवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
कोविड चाचण्यांसाठी प्रयोगशाळा उभारल्या जात आहेत. फिल्ड हॉस्पिटल, फिव्हर क्लिनिक असं चौफेर काम सुरू आहे. ‘चेस द व्हायरस’ अंतर्गत घरोघरी जाऊन लोकांच्या चाचण्या घेण्याचे कामही सुरू करण्यात येत आहे. सरकारकडून केल्या जाणाऱ्या या सर्व उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत दिली. ‘महाराष्ट्र डगमगलेला नाही. लढतो आहे’, असा विश्वास त्यांनी देशाला दिला आहे.
सरकार या सगळ्या परिस्थितीशी ताकदीने लढत आहे. राज्यात आरोग्य सुविधा वाढवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
कोरोनाची साथ आली तेव्हा या रोगाची चाचणी करण्यासाठी अवघ्या दोन प्रयोगशाळा राज्यात होत्या. गेल्या दोन ते सव्वा दोन महिन्यांत सरकारनं राज्यभरात १०० च्या आसपास प्रयोगशाळा उभारल्या आहेत. त्याशिवाय मुंबई, ठाणे व औरंगाबादमध्ये अनेक कोविड सेंटर उभारले आहेत. त्यापैकी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात एमएमआरडीएनं उभारलेले दोन फिल्ड हॉस्पिटल्स कौतुकाचा विषय ठरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या बैठकीत या रुग्णालयांचे फोटो सर्वांना दाखवले.