रिक्त झालेल्या पदांवर स्थानिकांना प्राधान्य द्या ! – सुभाष देसाई

रिक्त-झालेल्या-पदांवर-स्-Vacancies

रिक्त झालेल्या पदांवर स्थानिकांना प्राधान्य द्या ! – सुभाष देसाई

कोरोनाच्या वाढत्या विळख्यामुळे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजुर आपल्या गावी गेले आहेत. त्यामुळे दोन महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर सुरू झालेल्या उद्योगधंद्यांना आता मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज भासू लागलेली आहे. हीच गरज भागवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील रिक्त जागांवर स्थानिकांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उद्योजकांना केले आहे. कामगारांची समस्या सोडविण्यासाठी राज्यात आता औद्योगिक कामगार ब्युरो सुरू केला जाणार आहे. त्यामुळे नोकरी शोधणारे आणि नोकरी मागणारे यांच्यामधील दरी दूर होणार आहे, असे देखील देसाई म्हणाले आहेत.

तसेच उद्योगांसाठी राज्यात सुमारे चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव ठेवलेली आहे. विविध परवान्यांऐवजी आता ४८ तासांत महापरवाना दिला जाणार आहे. यामुळे राज्यात नव्या प्रकल्पांना सुरु होण्यास कमी कालावधी लागणार आहे. १२ विविध देशांतील गुंतवणुकदारांसोबत नुकतेच १६ हजार ३० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणूकदारांसोबत हे करार करण्यात आले आहेत, अशीही माहिती सुभाष देसाई यांनी यावेळी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here