तेजस ठाकरेंची मोहीम फत्ते, पालीच्या दुर्मिळ जातीचा लावला शोध !

तेजस ठाकरेंची मोहीम फत्ते, -Tejas Thackeray's campaign,

तेजस ठाकरेंची मोहीम फत्ते, पालीच्या दुर्मिळ जातीचा लावला शोध !

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र तेजस ठाकरे यांनी कर्नाटकात जाऊन पालींच्या नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. अक्षय खांडेकर यांच्या टीमसह तेजस यांनी हा शोध लावल्याने सर्वच स्तरातून या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कर्नाटकातील हसन जिल्ह्यातल्या होंगाडदहल्ला या गावाजवळील जंगलात केलेल्या संशोधनावेळी तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकर यांच्या टीमलाही दुर्मिळ प्रजातीची पाल सापडली आहे. नव्याने शोधण्यात आलेल्या या दुर्मिळ पालीचं त्यांनी ‘मँग्निफिसंट डवार्फ गेको’ असं नामकरण केलं आहे.

आंतराराष्ट्रीय ख्यातीच्या ‘झुटाक्सा’या नियतकालिकेत या दुर्मिळ प्रजातीच्या पालीवरील त्यांचा शोध निबंधही प्रसिद्ध झाला आहे. तेजस यांच्यासह अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि सौनक पाल या चार तरुण संशोधकांनी हा शोध लावला आहे. या कामी त्यांना ठाकरे वाइल्ड लाइफ फाऊंडेशन, बंगळुरूची नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने सहकार्य केले आहे.

पालीची ही प्रजाती साकलेशपूर येथील खडकाळ भागात आढळते. खासकरून उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातीच्या पाली आढळून येतात. या पालींची किमान लांबी ५८ मीटर असते. या दुर्मिळ प्रजातीच्या पालींची शेपटी हलक्या तपकिरी रंगाची असते, तसेच या पालीच्या डोक्यावर किंचित तपकिरी रंगाची पॅच (खवल्या सारखे) असतात. गोलाकार मोठ्या बुबळांच्या आणि बाजूला काळ्या बाह्यरेखा असलेल्या या पाली त्यांच्या वेगळ्या शरीर रचनेमुळे प्राणीतज्ञांचं लक्ष वेधून घेत आहेत.

भारतात एकूण ५० विविध प्रजातींच्या पाली आढळतात. त्यात या नव्या दुर्मिळ प्रजातीची भर पडली आहे. त्यामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेत भर पडली आहे. विशेष म्हणजे या टीमने गेली पाच वर्ष या नव्या प्रजातीच्या पालीवर संशोधन केलं आहे. दुर्मिळ प्रजातींच्या पालींवर जणुकीय तसेच इतर पालींपेक्षा या वेगळ्या का आहेत यावर प्राणी शरीर शास्त्रांच्या नियमानुसार हे संशोधन करण्यात आलं आहे. त्यामुळे तेजस आणि त्यांच्या टीमवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here