रेडझोन वगळता जुलै पासून दहावी-बारावीच्या वर्गाला सुरूवात..

रेडझोन वगळता जुलै पासू-From July except for the red zone

रेडझोन वगळता जुलै पासून दहावी-बारावीच्या वर्गाला सुरूवात..

रेड झोन वगळता जुलै महिन्यापासून नववी, दहावी आणि बारावीच्या वर्गांना प्रत्यक्षात सुरुवात केली जाईल. जुलैमध्ये शाळेचे वर्ग सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाची पूर्ण तयारी असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

तसेच या बैठकीत दहावी-बारावीच्या निकालाबाबतच्या संभाव्य तारखांबाबतही माहिती देण्यात आली. नुकतीच शालेय शिक्षण विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अनेक अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत शालेय शिक्षण, दहावी-बारावी निकाल, अकरावी प्रवेश प्रक्रिया, ऑनलाईन शिक्षण याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

तसेच यंदा २० मार्चच्या दहावी परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ आणि बारावीसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी बसले होते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. बारावीचे सर्व पेपर कोरोनामुळे लॉकडाऊनपूर्वी संपले होते. मात्र दहावीचा केवळ भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता.

मात्र, आता निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार येत्या १५ जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरीपर्यंत दहावीचा निकाल लावू असे सांगितले. कोरोना काळात ९७ % उत्तरपत्रिका या परीक्षकांकडून जमा करण्यात आल्या असून, स्कॅनिंग ही वेगाने सुरु आहे, अशी माहिती दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here