Skip to content Skip to footer

सलून आणि जिम सुरु करण्याची सरकारची परवानगी

सलून आणि जिम सुरु करण्याची सरकारची परवानगी

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मागील तीन महिन्यांपासून बदन असलेल्या सलून आणि जिम पुन्हा सुरु करण्याची राज्य सरकारने परवानगी दिली आहे. येत्या रविवारपासून सलून आणि जिम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. जिम आणि सलून या आठवड्यात सुरु होईल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.

मागील काही दिवपासून नाभिक संघटनेने पुन्हा सलून सुरु करण्याची अनुमती राज्य सरकारकडे मागितली होती. तसे निवेदन सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले होते. एकीकडे अन्य व्यवसायांना परवानगी दिली असताना, सलून व्यवसायाला परवानगी का नाही, असा सवाल नाभिक समाज आणि सलून व्यावसायिकांनी विचारला होता.

कोरोना काळातील लॉकडाऊन आणि अनलॉकिंगनंतर हळूहळू बहुतेक सेवा पूर्ववत होत आहेत. मात्र महाराष्ट्रातील सलून व्यवसाय अद्याप बंद आहेत. ही सेवा नियम-अटींसह सुरु करु द्यावी, अशी मागणी सलून व्यावसायिकांकडून सातत्याने केली जात होती. मात्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येत्या चार-पाच दिवसात सलून सुरु करण्याबाबत निर्णय होईल, असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आता सलून सुरु करण्याचा निर्णय राज्य सराकरने घेतला आहे

Leave a comment

0.0/5