एमटीडीसी ताब्यातील जमिनींचा खाजगीकरणातून पर्यटनदृष्ट्या राज्य सरकार विकास करणार !

एमटीडीसी ताब्यातील जमिनी-Lands in MTDC possession

एमटीडीसी ताब्यातील जमिनींचा खाजगीकरणातून पर्यटनदृष्ट्या राज्य सरकार विकास करणार !

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यातील शासकीय जमिनींचा आणि मालमत्तांचा पर्यटनदृष्टया विकास करण्यासाठी खाजगीकरणाच्या धोरणास तत्वत: मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे.

पहिल्या टप्प्यात गणपतीपुळे, माथेरान, महाबळेश्वर, हरिहरेश्वर, मिठबाव येथील महामंडळाचे रिसॉर्ट तसेच ताडोबा आणि फर्दापूर (औरंगाबाद) येथील मोकळ्या जमिनींचा विकास करण्यात येईल. या मालमत्ता पोटभाड्याने देण्याचा कालावधी उच्चस्तरीय समिती ठरवेल. तसेच जमिनीसाठी आकारावयाचे अधिमुल्य व वार्षिक भाडे देखील निश्चित करण्यात येईल. प्रत्येक प्रकल्पासाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यात येईल, अशी माहिती या बैठकीदरम्यान देण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here