..तर आधी ‘मेड इन चायना’ असलेला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हटवा…!

..तर आधी ‘मेड इन चायना’ -..So first ‘Made in China’

..तर आधी ‘मेड इन चायना’ असलेला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हटवा…!

भारत-चीनच्या वाढत्या संघर्षात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी आता जोर जोर धरू लागली आहे. आज अनेक व्यापारी वर्गाने पुढे येऊन चीनी वस्तूंवर बहिष्कार घातला आहे. अशातच आता गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. गुजरातमधील भारतीय ट्रायबल पार्टीचे प्रमुख नेता छोटू वसावा यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ‘जर भाजपा चिनी सामानाचा खरंच विरोध करत असेल तर आधी मेड इन चायना असलेला स्टॅट्यू ऑफ युनिटी हटवायला पाहिजे’ असं मत छोटू वसावा यांनी मांडले आहे.

चीन आपला शत्रू आहे. जर भाजपाचा चीनला खरंच विरोध असेल तर पहिल्यांदा स्टॅच्यू ऑफ युनिटी हटावावा, कारण तो मेड इन चायना आहे. चीनचा विरोध करायचा असेल, तर सुरूवात स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून करायला हवी”, असं छोटू वसावा अहमदाबाद मिररशी बोलताना म्हणाले. तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरातील आदिवासी लोकांच्या जमिनी घेण्यासाठी सरकार बळजबरी करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here