Skip to content Skip to footer

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत कोल्हापुरातील लोकप्रतिनीधींची चर्चा

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत कोल्हापुरातील लोकप्रतिनीधींची चर्चा

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि महावितरण अधिकारी यांची ऑनलाईन बैठक झाली. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मीटर रीडिंग न घेता थेट जून महिन्यात आलेले बिल हे मोठ्या रकमेचे असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ही बाब खासदार धैर्यशील माने यांनी ऊर्जामंत्री राऊत यांच्या निर्देशनास आणून दिली होती. 

यावेळी या बैठकीत शेतकरी वस्त्रोद्योग व घरगुती वीज ग्राहक यांच्या कोरोनाच्या काळातील आणि महापूर संदर्भातील महावितरणाच्या संबंधित येणाऱ्या समस्या ऊर्जा मंत्री राऊत यांच्यापुढे मांडल्या. तसेच यावर सविस्तर चर्चा ही यावेळी झाली. शेतकऱ्यांची महापुराच्या काळातील शेतीपंपाची झालेली १३ कोटी ८४ लाख रुपयांची नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी. महापुराच्या काळातील वीज वापर नसताना देखील शेतकऱ्यांना आलेली लाइटची बिले माफ करावीत.

२७ एचपीच्या वरील वीज ग्राहकांना राज्य शासनाने जाहीर केलेली ७५ पैशांची अतिरिक्त सबसिडी लवकर द्यावी. घरगुती वीज बिले यांमध्ये केलेली दरवाढ रद्द करावी. या प्रमुख मागण्यांसह शेतकरी यंत्रमागधारक व घरगुती वीज ग्राहकांच्या विविध मागण्या खासदार माने यांनी ऊर्जामंत्र्यांकडे मांडल्या.

Leave a comment

0.0/5