जमीन घोटाळा : माजी मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल….!

जमीन घोटाळा : माजी मुख्य-Land scam: Former chief

जमीन घोटाळा : माजी मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल….!

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात बेकायदेशीर जमीन बळकावल्या प्रकरणी नागपुरात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. प्रकरण असे की, नागपुरात ५० कोटी रुपयांची १० एकर जमीन बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्यात आलेली आहे. या प्रकरणात तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या नावे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

या तिघांविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी करीत फिर्यादी सतीश उके यांनी “फडणवीस आणि पुरोहित एकमेकांच्या जवळचे आहेत आणि एकमेकांच्या फायद्यासाठी त्यांनी राजकारणातील आपल्या पदाचा गैरवापर केला” असा आरोप केला. प्रत्यक्षात जमीन ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची (एमएसईबी) मालकीची आहे. जी आता भगवानदास पुरोहित विद्या मंदिरात हस्तांतरित केली गेली असून हे ट्रस्ट पुरोहित यांचे आहे.

उके यांनी आपल्या तक्रारीत फडणवीस, बनवारीलाल पुरोहित आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात भादंवि कलम ७४६७ (बनावट कागदपत्रे), ८४६८ (फसवणुकीच्या हेतूने बनावट) आणि १४७१ (खोटे कागदपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणून खटला) अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here