सिप्ला कंपनीतर्फे राज्य आपत्ती व्यवस्थापनाला ३ कोटीची मदत !

सिप्ला कंपनीतर्फे राज्य-State by Cipla Company

सिप्ला कंपनीतर्फे राज्य आपत्ती व्यवस्थापनाला ३ कोटीची मदत !

सध्या कोरोनाच्या वाढत्या सांर्गमुळे राज्याची आर्थिक बाजू अधिक मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन केले होते. याच आहवानाला प्रतिसाद देत सिप्ला या औषध निर्मिती कंपनीने ३ कोटी रुपयांची रक्कम राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीत जमा केली आहे. या निधीचा धनादेश कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल चोप्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

यावेळी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल चोप्रा यांनी कोविड १९ संदर्भात ते करत असलेल्या कामाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. यावेळी त्यांनी कोरोना या विषाणू विरुद्ध लढताना राज्य शासन करत असलेल्या उपायोजनांचे कौतूकही केले. या संपूर्ण कालावधीत औषधनिर्माण कंपन्यांना शासनाने उत्तम सहकार्य केल्यामुळेच कोविड १९ च्या रुग्णांसाठी उपयुक्त आणि जीवनदायी ठरणाऱ्या औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवता आल्याचे सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here