“भावी पिढीच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा”, मंत्री सामंतांचे केंद्राला आवाहन…!

“भावी पिढीच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा”, मंत्री सामंतांचे केंद्राला आवाहन…!

विद्यापीठ अनुदान आयोगाने येत्या सप्टेंबर महिन्यात विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. यासाठी नवीन नियमावली सुद्धा जाहीर केलेली आहे. मात्र राज्य सरकार आणि युवासेनेकडून परीक्षा न घेण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे. तसेच परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा जोर दिला आहे. केरळमधील घटनेचा संदर्भ देत सामंतांनी केंद्र सरकारने भावी पिढीच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा असे आवाहन केले आहे.

याबाबत ट्विट करत सामंतांनी केंद्र सरकारला आवाहन केले आहे. “आत्ता केंद्रसरकार अजून कसली वाट बघत आहे.. कर्नाटक सरकारने घेतलेल्या अभियांत्रिकी पूर्वपरीक्षेत विध्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असे पुढे आले आहे. केंद्रसरकारने भावी पिढीच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा असे ट्विट लोकसत्ताच्या बातमीचा आधार घेत केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here