भाजपा आमदाराच्या कंपनीने थकविले कोरोना योध्याचा पगार

By BJP-MLA-Company

भाजपा आमदाराच्या कंपनीने थकविले कोरोना योध्याचा पगार

           भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या मालकीच्या क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा गेल्या पाच महिन्यापासूनचा पगार न दिल्याचे वृत्त झी २४ मीडिया समूहाने समोर आणले आहे. त्यामुळे कोविड योद्धांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरण्याचा बनाव करणाऱ्या आमदार प्रसाद लाड याचा खोटेपणा समोर आलेला आहे.

             प्रकरण असे की, प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे लातूर समाजकल्याण विभागामार्फत वसतिगृहात काम करणाऱ्या सुरक्षारक्षक राजाराम मागील अनेक वर्षांपासून काम करत आहे. ध्या हे वसतिगृह कोविड केअर सेंटरसाठी लातूरच्या महानगरपालिकेने अधिग्रहित केले आहे. तेथेही तो आपली सेवा बजावत आहे.

              पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना ऍम्ब्युलन्स बोलावून डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये पाठवण्याचे कामही राजाराम करतो. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून क्रिस्टल इंटिग्रेटेड कंपनीने राजारामचा पगार केला नसल्याचा आरोप राजारामने केला आहे.

               यावर राजारामची कहाणी ऐकून त्याला सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करू असे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी बोलून दाखविले तसे आमदार प्रसाद लाड यांच्यावर सुद्धा जोरदार टीका केली आहे. देशाचे प्रमुख व्यक्ती सांगतात पगार थकवू नये. असे असताना त्यांच्या पक्षाचे व्यक्ती असे करीत असतील तर निराशाजनक आहे. असे सुद्धा महापौरांनी बोलून दाखविले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here