वंदेभारत अभियान अंतर्गत ५०,००० च्यावर प्रवाशी मुंबईत दाखल ?

वंदेभारत अभियान अंतर्गत-Under Vandebharat Abhiyan

वंदेभारत अभियान अंतर्गत ५०,००० च्यावर प्रवाशी मुंबईत दाखल ?

कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे देशभरात नाही तर संपूर्ण जगभरात हाहाकार माजला आहे. त्यातच इतर देशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी शासनाने वंदेभारत हे अभियान राबवण्याचा निर्णय केला होता. त्या माध्यमातून आज तागायत विविध देशातून ५० हजार १४९ प्रवासी ३५९ विमानाने मुंबईत दाखल झाले आहे.

या आलेल्या प्रवाशांसाठी खास करून मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्ह्यात पाठविण्याचे काम जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड आधी देशातून प्रवासी मायदेशी परतले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here