Skip to content Skip to footer

ज्या वनामध्ये वाघ संचार करतो, ते वन पर्यावरणीय दृष्टीने समृद्ध असते – मुख्यमंत्री

ज्या वनामध्ये वाघ संचार करतो, ते वन पर्यावरणीय दृष्टीने समृद्ध असते – मुख्यमंत्री

               महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला व्याघ्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आज सर्वत्र २९ जुलै व्याघ्रदिन म्हणून साजरा केला जातो. आज जगभरात मिळणाऱ्या वाघांच्या संख्यांपैकी ७० टक्के वाघ हे भारतात आढळतात. काही वर्षपूर्वी शिकार आणि इतर गोष्टींमुळे राज्यांत वाघांची संख्या कमी व्हायला लागली होती. यावर सरकारने तातडीने उपाययोजना आखत वाघांचे प्रमाण कसं वाढवलं जाईल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे.

              महाराष्ट्राची वनसंपत्ती ही मोठी आहे. ज्या जंगलात वाघ असतो तिकडचे निसर्गचक्र हे उत्तम मानलं जाते. त्यामुळे निसर्गाचं संतुलन कायम राखण्यासाठी वाघांची जोपासना करणं ही काळाची गरज आहे. सरकारसोबत नागरिकांचीही ही जबाबदारी आहे. त्यामुळे व्याघ्रदिन हा एका दिवसापुरता मर्यादीत न राहता, निसर्गचक्र आणि पर्यावरणाचं संतुलन कायम राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहण्याची गरज असल्याचं मत उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5