नव्या शैक्षणिक धोरणावर केदार शिंदे यांचे ट्विट वाचा..

नव्या-शैक्षणिक-धोरणावर-क-On new-educational-policy-c

नव्या शैक्षणिक धोरणावर केदार शिंदे यांचे ट्विट वाचा.. 

नव्या शैक्षणिक धोरणाला काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे काल झालेल्या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात आता आमूलाग्र बदल झालेले दिसून येणार आहेत. या निर्णयामुळे १० वी आणि १२ वीचे महत्व काहीप्रमाणात कमी होणार यात शंका नाही. मात्र आता या धोरणावर खुद्द दिग्दर्शक केदार शिंदे यांनी परखड मत मांडलं आहे.

केदार शिंदे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात की, “दहावी बारावीचा “तेरावा” घातला… शिक्षण पध्दती बदलली. आनंद आहे.. आता मुलांची रॅट रेस संपवा. जगू द्या त्यांना. कधी कधी वाटतं पालकांची परीक्षा घ्यायला हवी. तसाही त्यांचा अभ्यास झालेलाच असतो” असे म्हंटले आहे. कला, क्रीडा, संगीत, योग, समाज सेवा या विषयांना अभ्यासक्रमातच समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यांना एक्स्ट्रा करिक्युलर संबोधले जाणार नाही हा नवा बदल झालेला दिसून येणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांसाठी बहुभाषिक अभ्यासाची तरतूद आहे. दोन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये भाषा पटकन शिकण्याची क्षमता असते. बहुभाषिकत्वाचे फायदे असल्याने मुले या वयात तीन भाषा शिकतील, अशी माहिती या नव्या धोरणाविषयी कळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here