आमदार प्रताप सरनाईकांच्या मागणीला यश, आर्किटेक्चर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येची होणार चौकशी….!

आमदार प्रताप सरनाईकांच्या मागणीला यश, आर्किटेक्चर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येची होणार चौकशी….!

आर्किटेक्चर अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री यांनी काही महिन्यांपुर्वी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येला रिपब्लिकन न्युजचे अर्णब गोस्वामी हेच कारणीभूत असून या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी नाईक यांच्या पत्नीने व्हिडिओच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील या प्रकरणाची तपासणी करण्याची मागणी केली होती.

आता आमदार सरनाईक यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे. याबाबत खुद्द सरनाईक यांनी फेसबुकच्या माध्यमांतून माहिती दिलेली आहे. राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांनी आर्किटेक्चर अन्वय नाईक यांच्या मृत्यूची पुर्नचौकशी करण्याचे आदेश संबंधित खात्याला दिले असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

आज सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआय दखल देते, सीआयडी तसेच बिहार पोलीस दखल देते. मात्र मुंबई पोलिसांनी जशी राजपूत प्रकरणी योग्य दखल घेतली आहे, तशी दखल मुंबई पोलिसांनी नाईक प्रकरणात घ्यावी अशी विनंती आमदार सरनाईक यांनी केली आहे. त्यामुळे निश्चितच नाईक यांना न्याय मिळेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here