Skip to content Skip to footer

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी चौकशीअंती कारवाई करणार ! – देशमुख.

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी चौकशीअंती कारवाई करणार ! – देशमुख.

वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणाची चौकशी करण्यात येईल. तसेच चौकशीअंती दोषी आढळलेल्या संबंधितांवर नियमान्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली.

या संदर्भात बोलताना देशमुख म्हणाले की, आर्किटेक्चर अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री यांनी काही महिन्यांपुर्वी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येला रिपब्लिकन न्युजचे अर्णब गोस्वामी हेच कारणीभूत असून, या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी नाईक यांच्या पत्नीने निवेदनाद्वारे केली होती.

यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणासंदर्भात कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. त्यांच्या निवेदनास उत्तर देताना गृहमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी सदस्य सुनिल प्रभू, ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनीही गुन्हेगारास त
तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

Leave a comment

0.0/5