अर्नबला हक्कभंग भोवणार ? या प्रकरणात एका पत्रकाराला झाली आहे जेल.
आर. रिपब्लिकन वृत्तसमूहाचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी यांनी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चालू डिबेटमध्ये एकेरी उल्लेख केला होता. या घटनेवरून त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी मांडला होता. हा प्रस्ताव पारित झाला तर अर्णब गोस्वामी याच्यावर कडक कारवाई होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात होता.
निवडून आलेल्या कोणत्याही लोकप्रनितिधी सदस्याचा अपमान झाल्यास हक्कभंग प्रस्ताव आणला जातो. लोकप्रतिनिधींचा मान राखण्याची सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. त्यामुळे मा. मुख्यमंत्री, मा. आमदार असे संबोधले जाते. याचा भंग केल्यास लोकप्रतिनिधींवर बेछुट आरोप केल्यास हक्कभंग आणला जातो. चालू डिबेटमध्ये अर्णब गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा एकेरी उल्लेख करून अरेरावी भाषा वापरली होती. त्यामुळे त्याच्या विरोधात हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.