अभिनेता प्रकाश राज हे नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर अनेकवेळा टीका करतं दिसून आले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी सिनेअभिनेत्री कंगना रानौत प्रकरणी ट्विट केले आहे. त्यांनी कंगनाला टार्गेट करत एक मिम शेअर करत तिची खिल्ली उडवली आहे.
प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर एक मिम शेअर केलंय जय वेळ लिहिले आहे की, कंगना जर सिनेमा करून स्वतःला राणी लक्ष्मीबाई समजत असेल तर या हिशेबाने दीपिकाला पदमवती, रितिकाला अकबर, अजय देवगण भगत सिंह, अमीर खान मंगल पांडे आणि विवेक ओबरॉय नरेंद्र मोदीजी झालेत, प्रकाश राज यांच्या या ट्विटनंतर लोकांनीं संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यापूर्वी कंगनाला Y दर्जाची सुरक्षा दिल्यामुळे प्रकाश राज यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. एरपोर्टवर चालणाऱ्या गार्डबरोबर रस्त्यावर पायी चालणाऱ्या मजुरांचा फोटो शेअर करत हा आहे न्यु इंडिया असे ट्विट त्यांनी केले होते.
#justasking pic.twitter.com/LlJynLM1xr
— Prakash Raj (@prakashraaj) September 12, 2020