‘याच अंबानीला मोदींनी ३० हजार कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं’ ; प्रशांत भूषणचे ट्विट.

याच-अंबानीला-मोदींनी-३०-ह-Yach-Ambani-Modi-30-h

‘याच अंबानीला मोदींनी ३० हजार कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं’ ; प्रशांत भूषणचे ट्विट.

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांनी सध्या युनायटेड किंगडम मधील न्यायालयात चिनी बँकांच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आपण एक साधारण आयुष्य जगत असल्याचे बोलून दाखविले आहे. तसेच आपल्याकडे असलेले दागिने विकून आपण आपल्या वकिलांची फी भरत असल्याचंही त्यांनी न्यायालयाला सांगितले आहे. सध्या आपला खर्च पत्नी टीना अंबानी चालवत असल्याचे त्यांनी सांगितले. हाच मुद्दा पकडत प्रशांत भूषण यांनी मोदींना टोला लगावला आहे.

प्रशांत भूषण यांनी ट्विट केले आहे की, “अनिल अंबानी यांनी युकेमधील न्यायालयात, वकिलांची फी भरण्यासाठी पत्नीचे दागिने विकले असून, आता आपल्याकडे काहीही नाही, केवळ एक छोटी कार आहे अशी माहिती दिली. ही तीच व्यक्ती आहे ज्यांना मोदींनी ३० हजार कोटींचं राफेलचं ऑफसेट कंत्राट दिलं”.असं प्रशांत भूषण यांनी म्हंटले आहे.

यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीदरम्यान आपण ९.९ कोटी रूपयांच्या सोन्याचे दागिने विकले. आता आपल्याकडे कोणतेही महागडं सामान शिल्लक नाही, असे अनिल अंबानी यांनी न्यायालयाला सांगितलं आहे. दरम्यान, यावेळी न्यायालयानं त्यांना त्यांच्याकडे असलेल्या लग्झरी गाड्यांबद्दलही प्रश्न केला असता, “या सर्व माध्यमांमधून अफवा पसरवल्या जात आहेत. माझ्याकडे कधीही रोल्स रॉयस नव्हती. मी सध्या केवळ एकाच गाडीचा वापर करत आहे,” असेही अंबानी म्हणाले. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

49 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here