Skip to content Skip to footer

मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी क्लास १ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.

मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी क्लास १ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.

राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु आहे. त्यातच सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहे. मात्र अशा संकटातही नाशिकच्या एका उच्च पदावर बसलेल्या अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोटी माहिती दिल्यामुळे जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य अतिरिक्त अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची घोषणा केली होती. तसेच युद्ध पातळीवर ही मोहीम राबवण्याचे सर्व सरकारी अधिकाऱ्यांना आदेश दिले होते.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबवताना शिंदे यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांना खोटी आकडेवारी सादर केली होती असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता.

राजपत्रिक वर्ग १ च्या उच्च अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद होण्याची ही राज्यात पहिलीच वेळ आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापक अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सरकारवाडा पोलीस स्थानकात शिंदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a comment

0.0/5