Skip to content Skip to footer

राज्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेल मालक-चालकांशी मुख्यमंत्री ठाकरे यांची चर्चा.

राज्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेल मालक-चालकांशी मुख्यमंत्री ठाकरे यांची चर्चा.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मागील सहा महिन्यांपासून राज्यातील सर्वच हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद आहेत. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या हॉटेल व्यवसायिकांनी आज मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवसायिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणार असाल तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून हॉटेल सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. मात्र, एकदा हॉटेल सुरु केल्यावर ते पुन्हा बंद करावे लागणार नाहीत, याची जबाबदारी हॉटेल मालक आणि चालकांवर असेल, असे मत उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

हॉटेल सुरु केल्यानंतर ते पुन्हा बंद करावे लागणार नाही याची जबाबदारी हॉटेल मालकांवर असेल. हॉटेल मालकच माझे कॅमेरा आहेत. त्यांनीच मला सांगायला पाहिजं की आम्हाला कोरोना नियंत्रण करायचं आहे. थोडे दिवस थांबा. तुम्ही परवानगी द्या. एकदा का हॉटेल सुरु केलं, तर जबाबदारीने चालवले पाहिजे. हॉटेल मालकांनी पुन्हा एकदा विचार करावा आणि हॉटेल कसे चालवणार याची विशेष पद्धत सरकारला द्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5