उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण
मागील अनेक दिवसानापासून सामान्य नागरिकांनाबरोबर मंत्री,आमदार आणि खासदारांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. काही दिवसांपर्वी शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते आता त्या पाठोपाठ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विटवरून दिली आहे.
या संदर्भातील माहिती खुद्द मंत्री सामंत यांनी ट्विटकरून दिली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, गेले दहा दिवस स्वतः विलगिकरनात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली.रिपोर्ट+ve आला आहे.मी गेले १० दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे.. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार. असे ट्विट यांनी केले आहे.
मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झालेले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड करोना बाधित झाले असून अप्पर मुख्य सचिव दर्जाच्या काही अधिकाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ठाकरे सरकारमधील ४३ पैकी १५ मंत्री तसेच डझनभर अधिवाक्यांना कोरोनाची लागण झाली आहे.