Skip to content Skip to footer

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा ढकलल्या पुढे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा ढकलल्या पुढे.

कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागणीसाठी लेखणीबंद आंदोलन सुरू केल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्वच अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी २४ ऑक्टोबरपासून लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे परीक्षा विभागाचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहे. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून १ ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेऊनही कोणताही मार्ग न निघाल्यामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या कशा? असा प्रश्न विद्यापीठ प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

विद्यापीठातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा नियोजित वेळेत घेणे शक्य नसल्यामुळे १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5