Skip to content Skip to footer

हाथरस प्रकरणातील नराधमांच्या पुतळ्याचे शिवसेनेकडून दहन

हाथरस प्रकरणातील नराधमांच्या पुतळ्याचे शिवसेनेकडून दहन

देशात “बेटी पढाओ, बेटी बचाओ”चा नारा दिला जात असताना भाजपची सत्ता असलेल्या उत्तरप्रदेशात “बेटी भगाओ, बेटी जलाओ” सारखी अमानवी कृत्ये घडत आहेत. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात महिलांवरील अत्याच्यारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पिडीतेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या ऐवजी गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचे काम उत्तरप्रदेश सरकार कडून होत आहे. त्यामुळे बलात्कारातील आरोपींना पाठीशी घालणारी बीजेपी म्हणजेच “बेटी जलाओ पार्टी”चे उत्तरप्रदेशातील सरकार बरखास्त करावे, आरोपींना फाशी व्हावी आणि पिडीत दलित युवतीच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेना पक्षातर्फे आज कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने करण्यात आली.

यावेळी “बलात्काऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो”, “बरखास्त करा, बरखास्त करा.. उत्तरप्रदेश सरकार बरखास्त करा”, “राजीनामा द्या, राजीनामा द्या.. योगी आदित्यनाथ राजीनामा द्या”, अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून सोडला. यानंतर हाथरस प्रकरणातील नराधमांच्या पुतळ्याचे शिवसेनेच्या वतीने दहन करण्यात आले.

Leave a comment

0.0/5