अनिल परब यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु
परिवहन मंत्री अनिल परब यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, बच्चू कडू, नितीन राऊत, एकनाथ शिंदे यां मंत्र्यांनाही करोनाची बाधा झाली होती. त्यापाठोपाठ आता परिवहन मंत्री अनिल परबही करोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु करण्यात आले आहेत.