महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुन्हा सुरु!, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती होणार गठीत
राज्य सरकारचा सर्वोच्च समजला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ मागच्या पाच वर्षात कोणालाही देण्यात आलेला नव्हता. मात्र आता पुन्हा हा पुरस्कार सुरु करण्याचा महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे या समितीचे उपाध्यक्ष असतील, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे शासकीय सदस्य तर डॉ. अनिल काकोडकर, जेष्ठ संजयक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे, उद्योगपती बाबा कल्यानी, अभिनेते दिलीप प्रभावळकर हे सदस्य असतील.
२०१५ साली तत्कालीन फडणवीस सरकारने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना हा पुरस्कार दिला होता. त्यानंतर वादही झाला. मात्र २०१५ नंतर हा पुरस्कार कोणालाही देण्यात आलेला नाही.