Skip to content Skip to footer

कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या परिवारास शिवसैनिकांची मदत, आर्थिक मदतीसह दिले जीवनावश्यक साहित्य

कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या परिवारास शिवसैनिकांची मदत, आर्थिक मदतीसह दिले जीवनावश्यक साहित्य

सध्या राज्यात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातलेले आहे. कोरोनामुळे आज अनेकांना निष्पाप विनाकारण या संसर्गामुळे आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. आज कर्ता व्यक्ती कोरोनाच्या संसर्गामुळे गमावल्यामुळे अनेक घरादारावर आर्थिक संकट ओढावलेले आहे. असाच प्रसंग नालासोपारा येथे घडलेला दिसून आला आहे.

नालासोपारा येथील शिवसैनिक ओम जंगम यांच्या बंधूंचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. यानंतर “शिवसेना न्युज कमेंन्ट आर्मी” या व्हाटसॲप समुहाने पुढाकार घेत शिवसैनिकांना मदतीसाठी साद घातली होती. शिवसैनिकांनी भरभरुन प्रतिसाद देत जवळपास ५७ हजार रुपये जमा करून जंगम यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देऊ केली होती. त्यामुळे शिवसेना पक्षाची ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या बोधवाक्याची शिवसैनिकांच्या वर्तणुकीतून पुन्हा एकदा प्रचिती आली होती.

यावेळी शिवसैनिक शिवराम भोजने, केसरीनाथ पाटील, सुदाम शिनगारे, नामदेव घुले यांच्या मार्गदर्शनाखाली लोकेश फुंडे, जालिंदर कोपनबैने, रावसाहेब पाटील, अक्षय ठाकुर, शरद क्षिरसागर, ऋषिकेश इंगळे, केतन मोरे, विशाल फुलसुंदर आदी शिवसैनिकांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता.

Leave a comment

0.0/5