दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होणार जमा ! ; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात आज वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
शेतकऱ्यांना दिली जाणारी ही मदत दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सध्या केंद्राकडून राज्याला ३८ हजार कोटी रुपये येणे बाकी असल्याचीही माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या राज्याच्या हक्काचे पैसे केंद्राकडून येणे बाकी आहे. तरी नैसर्गिक संकटे येणं काही थांबत हे एक कटू सत्य आहे, असे मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविले. तसे कोणतेही संकट आले तरी मी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना दिलेला शब्द आम्ही पूर्ण करणारच, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखविले.