Skip to content Skip to footer

राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण !!


राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण !!

राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झालेली आहे. या संदर्भातील माहिती खुद्द फडणवीस यांनी ट्विट करून दिलेली आहे. कोरोनाच्या संकटात देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यभराचा दौरा करून प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला होता. त्यात दररोज अनेकांच्या गाठीभेटी घेण्याचा सिलसिला त्यांचा सुरूच होता.

त्यात राज्यात आलेल्या ओल्या दुष्काळासंदर्भात अनेक तालुक्यांचा दौरा फडणवीस यांनी करून नुकसान झालेल्या शेत पिकाची पाहणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. यातच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या संदर्भात ट्विट करताना फडणवीस म्हणतात की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून, मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे ट्विट त्यांनी केले आहे.

Leave a comment

0.0/5