मुंबईत कोरोनाचा धोका लक्षात घेता मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला ‘हा’ निर्णय

ads

मुंबईत कोरोनाचा धोका लक्षात घेता मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला ‘हा’ निर्णय

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पर्यटन, पर्यावरण आणि मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्वाचे पाऊल उचलले आहे. आदित्य ठाकरे यांनी सर्व उपाययोजनांचा आढावा घेऊन कोणत्याही आवाहनाला सज्ज राहण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा खबरदारीची पाऊले उचलली गेली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जनतेला संबोधित करता दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. या अनुषंगाने कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट राहिलेल्या मुंबईवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं असून, आदित्य ठाकरे यांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे.

यासाठी घेतलेल्या विशेष बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच अनेक सूचना करण्यात आल्या. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी आपण खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

दिवाळीनंतर महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. गर्दी टाळली नाही तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आपण आमंत्रणच देऊ असे अनेक जाणकारांनी आधीच सांगितले आहे. त्यामुळेच दिवाळी संपताच आदित्य ठाकरे यांनी ही आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी हा मुद्दा अधोरेखित केला. दिवाळीचा सण मागे पडला असताना व मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मजूर मुंबईत परतत असताना आपल्याला आता अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे, असे ही सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here