सगळे उघडलं म्हणजे कोरोना गेला असे समजू नका – उद्धव ठाकरे
राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील जनतेशी सातत्याने फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधून जनतेला धीर देण्याचे काम करतायत. आज पुन्हा रविवारी सायंकाळी रात्री ८ :०० वाजता मुख्यमंत्री ठाकरे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना संदर्भात राज्यातील जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून चर्चा केली.
पाडव्याला सर्व प्रार्थना स्थळे उघडली. येत्या कार्तिक एकादशीला गर्दी न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले आहे. आज नागरिकांनी सर्व सण अत्यंत साधेपणाने साजरा केले आहे. तसेच उत्तर भारतीय बांधवांनी छट पूजा सुद्धा अत्यंत साधेपणाने साजरा केली होती. त्याचमुळे नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे फुगत चाललेला कोरोनाचा आकडा खाली आला आहे. असे सुद्धा मुख्यमत्र्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.
दिल्ली आणि परदेशात वाढत असलेल्या कोरोनाचा संदर्भ देताना मुख्यमंत्री म्हणाले की, दिल्लीत दुसरी, तिसरी लाट आली आहे. परदेशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. आज गर्दी वाढली तर कोरोना वाढणार आहे मारणार नाही असे बोलताना जेष्ठ नागरिकांना कोरोनाचा अधिक धोका आहे असे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.