येणारी कोरोना लाट आधी पेक्षा अधिक उग्र असेल, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

येणारी-कोरोना-लाट-आधी-पेक-Incoming-corona-wave-before-peck
ads

येणारी कोरोना लाट आधी पेक्षा अधिक उग्र असेल, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

राज्यातील जनतेशी सातत्याने फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधून जनतेला धीर देण्याचे काम करतायत. पुन्हा रविवारी सायंकाळी रात्री ८ :०० वाजता मुख्यमंत्री ठाकरे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना संदर्भात राज्यातील जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून चर्चा केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील भाविकांना कार्तिकी वारी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोनाची पुढील लाट ही लाट नसून त्सुनामी असण्याची भीती मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यामुळे नागरिकांना गाफिल राहू नये आणि हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क लावणे या त्रिसूत्रीचे पालन करावे, असेही आवाहन केले आज. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाचा वाढता आकडा आणि राज्य सरकारचे प्रयत्न याचीही राज्यातील नागरिकांना माहिती दिली होती.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आपण सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडली आहेत. चार दिवसांवर कार्तिकी वारी येत आहे. कार्तिकीची वारी साधेपणाने पार पाडा. गर्दी न करता सण-उत्सव साजरे करा. कोरोनाचे संकट टळलेले नाही, तरुणांनो सावध राहा.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, येणारी लाट आधीच्या लाटेपेक्षा अधिक उग्र असू शकते. २४-२५ कोटी जनतेला आपल्याला लसीकरण करावे लागणार आहे. एकदा डोस दिला, तर पुन्हा बुस्टर डोस द्यावे लागणार आहे. डोस दिल्यावर रुग्णाला कोणत्या तापमानात ठेवायचे हे सर्व अधांतरी आहे. त्यामुळे हात धुवा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि मास्क लावा ही त्रिसूत्रीच पाळावी लागणार आहे असे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी वक्त्यव्य केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here