आपल्या विरोधकांना त्रास देणे ही भाजपाची जुनी सवय, मंत्री जयंत पाटलांचा टोला

आपल्या-विरोधकांना-त्रास-Harass your-opponents

आपल्या विरोधकांना त्रास देणे ही भाजपाची जुनी सवय, मंत्री जयंत पाटलांचा टोला

पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारासाठी मावळ येथे आले असता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढविला होता. यावर बोलताना पाटील म्हणाले की, विरोधी राजकीय नेत्यांना त्रास देण्याची भाजप पक्षाची जुनी सवय आहे अशी टीका जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केली.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, निष्ठावान कारकर्त्यांना डावलण्यात येत असल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे, त्याचा फटका भाजपला येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच बसेल, असे भाकीत सुद्धा पाटील यांनी केले. पुढे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर केलेल्या ईडी कारवाहीवर पाटील यांनी वक्त्यव्य केले.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने छापे घातले असले, तरी त्यातून काही मिळणार नाही. विरोधी राजकीय नेत्यांना त्रास देण्याची भाजपची ही सवय जुनीच आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्यास ही आघाडी आणखी बळकट होईल असे बोलून दाखविले होते.

भाजपच्या उमेदवाराकडे सांगण्यासारखे काही नाही. स्वपक्षीयांना डावलून भाजपमध्ये इतर पक्षातून गेलेल्या कार्यकत्र्यांना संधी दिली जाते. त्यामुळे निष्ठावंत अस्वस्थ आहेत. भाजप कार्यकर्ते मनापासून काम करताना दिसत नाहीत. यंदा शिवसेना आपल्याबरोबर आहे. त्याचा फटका स्वाभाविकपणे भाजपला बसेल. या सर्व वातावरणाचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो.’ असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here