कॉम्रेड उदाराम तुळशीराम देवरे स्मुर्ती उद्यानाच्या शुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन
सटाणा नगर परिषदेच्या वतीने कॉ. तुळशीराम देवरे स्मुर्ती उद्यानात खुले वाचनालय उभारून वाचन सांस्कृती टिकवण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. या वाचनालयामुळे भागातील नागरिक, जेष्ठ नागरिक, युवक आणि युवतींना निश्चित यांचा फायदा होणार आहे तसेच विरंगुळा म्हणून उद्यान उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन मविप्र संचालक डॉ देवरे यांनी केले आहे.
सटाणा नगरपरिषदेच्या वतीने नामपूर रोड येथे कॉम्रेड उदाराम तुळशीराम देवरे स्मुर्ती उद्यानात वाचनालय आणि उद्यान शुशोभीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा संचालक डॉ प्रशांत देवरे आणि नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या अद्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे म्हणाले की, शहराच्या विविध भागात नागरीकांच्या सोयी सुविधासाठी उद्यान, ग्रीन जिम, जॉगिंग ट्रॅक उभारले जात असून सटाणा शहर प्रगतीच्या वाटेने वाटचाल करत आहे. हे सर्व करत असताना शहरातील सामान्य नागरिक डोळ्यासमोर ठेऊन विकास कामे हाती गेट आहोत. सध्या नागरपरिषदेमध्ये एकाच वाचनालय असून लोकसंख्याच्या दृष्टीने वाचनालयाची संख्या येणाऱ्या काळात वाढवण्यात येणार आहे, त्याला अनुसरून स्व. आनंदा निकम यांच्या नावाने वाचनालय सुरु करण्यात येणार आहे.