मुकेश अंबानी आणि मार्ग झुकरबर्ग यांच्यात होणार आज चर्चा, लवकरच भारतात होऊ शकते मोठी गुंतवणूक

मुकेश-अंबानी-आणि-मार्ग-झु-Mukesh-Ambani-and-Marg-Zhu

मुकेश अंबानी आणि मार्ग झुकरबर्ग यांच्यात होणार आज चर्चा, लवकरच भारतात होऊ शकते मोठी गुंतवणूक

फ्युएल फॉर इंडिया २०२० हा इव्हेंटमध्ये आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांच्यात भारतात येणाऱ्या नव्या व्यवसायसंदर्भात चर्चा होणार आहे. दोन दिवस हा कार्यक्रम चालणार असून १६ डिसेंबर रोजी या कार्यक्रमाचे शेवटचे सेशन होणार आहे.

भारताच्या आर्थिक विकासाचा वेग वाढवण्यासाठी डिजिटलीकरण आणि लहान उद्योगांची त्यातील भूमिका या विषयावर मार्क झुकेरबर्ग आणि मुकेश अंबानी यांच्यात चर्चा होणार आहे.

फिशर यांनी असे म्हटले आहे की, ‘मीशो आणि अनअकॅडमी सारख्या कंपन्यांमध्ये फेसबूकने अल्प गुंतवुणूक केली आहे असा एकमेव देश म्हणजे भारत आहे. संशोधनाला चालना देणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. फेसबुकला भारतात दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे. आपलं ऑनलाइन अस्तित्व जाणवावं आणि त्यात वाढ व्हायला मदत व्हावी यासाठी फेसबुक सतत व्यवसायांसाठी उपयुक्त अशी नवी सोल्युशन सादर करत असतं.’

‘फेसबुकने भारतात गुंतवणूक करताना काही असे करार केले जे त्यांनी जगभरात कुठेही केलेले नाहीत. भारतात होणारं संशोधन आणि त्यामुळे तिथल्या जीवनशैलीत होणारे बदल त्यांचा परिणाम याची जाणीव फेसबुकला असून हीच गोष्ट फेसबुकला भारताची खासियत वाटते. त्यामुळेच आम्ही भारतात विशेष गुंतवणूक केली आहे. आम्ही भारतासाठी एक विशेष स्ट्रक्चर विकसित केलं आहे. जे आम्ही जगभरात केलं नाही ते आम्ही भारतात करणार आहोत. इथं आम्ही विशेष गुंतवणूक आणि करार करत आहोत.’

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here