राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवार पासून उमेवारी अर्ज भरण्यास सुरवात झालेली आहे. राज्यातील एकूण ३४ जिल्ह्यांमध्ये तब्बल १४,२३४ ग्रामपंचातींमध्ये एकत्रित निवडणूक पार पडणार आहे. तसेच १८ जानेवारीला एकत्रित मतमोजणी होणार आहे.
वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज भरण्यास बुधवार पासून सुरवात झाली आहे. मात्र पहिल्या दिवशी हवा तेवढा प्रतिसाद आणि उत्साह उमेदवारांमध्ये दिसलेला नाही. नगर मध्ये ७६७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूका पार पडणार आहे . मात्र पहिल्या दिवशी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.
हिंगोली जिल्ह्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा पहिला दिवस होता. याही जिल्ह्यात एकही उमेदवार आपला अर्ज भरण्यास समोर आलेला नाही. अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन वेबसाईटद्वारे सोय करुन देण्यात आली आहे. ही वेबसाईट सकाळी सुरु होणे अपेक्षित होते.
दरम्यान, २०२०-२१ च्या निवडणुकीत दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे सरपंच-उपसरपंच पदाचे आरक्षण निकालानंतर जाहीर होणार आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी, भाजप, मनसे या सर्वच प्रमुख पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे गाव पातळीवरील निवडणुका रंगतदार होणार आहेत.