खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेबांनी लढण्याचं बळ दिलं – संजय राऊत

खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेबांनी लढण्याचं बळ दिलं – संजय राऊत

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी जागवल्या.

पत्रकारांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण कधी येते हा प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी सामनाची पायरी चढल्यावर बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते, अशा भावना व्यक्त केल्या. सलग ३० बाळासाहेबांसोबत काम केले असल्याचं संजय राऊत यांनी सांगितले. ५० वर्षांपूर्वी मराठी माणूस खचला होता, त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचे बळ दिले, असे संजय राऊत म्हणाले.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शतकातून एकदाच निर्माण होतात, असे वक्तव्य त्यांनी केले. बाळासाहेबांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाला वेगळ वळण दिले, त्यांनी हिंदुत्वाची लाट निर्माण केली. बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण ठेवावे लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस ५० वर्षापूर्वी खचला होता. खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचे बळ दिले. आज महाराष्ट्रातील मराठी माणूस आत्मविश्वासानं उभा राहतो त्याचं श्रेय बाळासाहेब ठाकरेंना जाते. मराठी माणूस यापुढील अनेक शतकं त्यांचं स्मरण करेल, असही संजय राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here