२६ जानेवारीपासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तुरुंग पर्यटनाला होणार सुरवात

२६-जानेवारीपासून-मुख्यमं-From 26th January onwards

२६ जानेवारीपासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तुरुंग पर्यटनाला होणार सुरवात

आता पर्यंत सिनेमा आणि मालिकांमधूनच तुरंग आणि त्यांची दृश्य पाहायला मिळाले आहे. मात्र आता प्रत्यक्षात तुरुंगातील जीवन पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. अजय सरकारने तुरूंग पर्यटन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरूवात २६ जानेवारी २०२१ पासून होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तुरूंग पर्यटन योजनाचं उद्घाटन होणार असून, टप्प्यानं राज्यातील इतर जेलचा यात समावेश केला जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. राज्यात ६० तुरूंग आहे. जवळपास २४ हजार कैदी या तुरूंगात आहेत. ३ हजार कैदी तात्पुरत्या तुरूंगात आहेत.

जेल पर्यटनाची सुरूवात आम्ही करत आहोत. त्याला विद्यार्थी व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. २६ जानेवारीपासून याची सुरूवात केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सिद्वारे यांचे उद्घाटन करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आपण स्वतः गोंदियातून या कार्यक्रमाला हजर राहणार आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here