बजेटमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४०० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता

महाराष्ट्र बुलेटिन : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी राज्यात विविध क्षेत्रांत करण्यात आलेल्या अनेक तरतुदींची आणि घोषणांची माहिती दिली. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा वाढाव्यात, या दृष्टीने विचार करून आरोग्य क्षेत्रावर अधिक भर या अर्थसंकल्पात देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णालयांसोबतच नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जाणार आहेत.

तसेच या बजेटमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४०० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे.

या स्मारकाचे काम दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात बांधकाम, वाहनतळ, उद्यान आदी कामं करण्यात येणार आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान, लेझर शो, ग्रंथालय आदी कामांचा समावेश असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here