कोरोना लढ्यातील महिलांचे योगदान इतिहास विसरू शकत नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र बुलेटिन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तमाम स्त्री शक्तीला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, कोरोनाच्या या भयानक संकट काळात स्त्री शक्तीने कुटुंबांना सावरले, सगळ्यांना आधार दिला. कोविड योद्धा म्हणूनही स्त्रियांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. या लढ्यामधील त्यांच्या योगदानाला इतिहास विसरणार नाही. अशा शब्दांत त्यांनी स्त्री शक्तीला शुभेच्छा दिल्या आहेत.

यासोबतच मुख्यमंत्र्यांनी “महाराष्ट्र राज्य महिलांसाठी सुरक्षित आहेच, पण राज्याला अजून सुरक्षित करण्याची शपथ घेऊया, त्यासाठी वचनबद्ध होऊया, महिलांच्या दृष्टिकोनातून अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध होऊया” असे आवाहन देखील केले. कोरोनाच्या संकटामुळे मुख्यमंत्र्यांनी दृकश्राव्य माध्यमातून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुभेच्छा देताना म्हटले की, “हा दिवस महिलांप्रती ऋण व्यक्त करण्याचा किंवा कर्तव्याचा भाग म्हणून नाही तर आयुष्यभर धैर्याने साथ देणाऱ्या स्त्री शक्तीला वंदन करण्याचा आहे. महाराष्ट्राला थोर, कर्तबगार, विचारवंत, समाजसुधारक, शूर, धाडसी महिलांची परंपरा लाभली आहे. त्यामध्ये मॉंसाहेब जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्यासह अनेक महिलांचा उल्लेख करता येईल. महिला दिनानिमित्ताने यांना वंदन तर करावेच लागेल, परंतु त्यांचा वारसा जपणाऱ्या सध्याच्या काळातील महिलांना देखील वंदन करावे लागेल.”

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here