मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली कोरोनाची लस, दिला ‘हा’ संदेश, जाणून घ्या

महाराष्ट्र बुलेटिन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईमधल्या जे. जे. रुग्णालयामध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी साडेबाराच्या सुमारास लस घेतली असून त्यांच्यासोबत रश्मीताई ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

लोकांमध्ये कोरोना लसीसंदर्भात ज्या काही शंका आहेत, त्यांचं निरसन व्हावं आणि सर्वांनी या लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असा संदेश मुख्यमंत्र्यांनी यामधून देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्र्यांना कोव्हीशील्ड लसीचा डोस देण्यात आल्याचे समोर आले असून त्यांच्याबरोबरच मिलिंद नार्वेकर यांनी देखील कोरोनाची लस घेतली आहे. तसेच त्यांच्या निकटवर्तीयांपैकी रश्मीताई ठाकरेंच्या आई मीनाताई पाटणकर यांनी देखील लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांच्यासमवेत डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी देखील उपस्थित होते.

देशात सध्या १ मार्चपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. यामध्ये ६० वर्षांवरील व्यक्तींना आणि ४५ वर्ष पूर्ण ते ६० वर्ष वय असणाऱ्या व व्याधी (कोमॉर्बिड) व्यक्तींना कोरोनाची लस दिली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here